मी मराठी वर्तमानपत्रं का वाचत नाही?
सध्याचा काळ मानसिक आरोग्य बिघडवणारा आहे. सोशल मीडिया ते मोठ्या प्रमाणावर बिघडवण्याचं काम करतो, हे माझं अनुभवान्ती मत झालं आहे. फारसं वाचन नसणारे अनेक जण तिथं भारंभार गप्पा मारत सतत कुणाबद्दल तरी तुच्छता व्यक्त करत असतात. ही तुच्छता हल्ली मला मराठी वर्तमानपत्रांच्या संपादकांमध्येही मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळते आहे. त्यापासून स्वत:चं मानसिक आरोग्य सांभाळणं कष्टप्रद होतं. त्यामुळे मी ती वाचणंच सोडून दिलंय.......